350 रूपये भरुन मिळेल गुगलची ही प्रिमियम सेवा


गुगलने अँड्राइड युजर्ससाठी एक नवीन प्रिमियम सेवा सुरू केली आहे. यामध्ये युजर्स 4.99 डॉलर्स (350 रूपये) दर महिन्याला भरून अ‍ॅप्स आणि गेम्सचा आनंद घेऊ शकतील. या सेवेत तुम्हाला 350 पेक्षा अधिक प्रिमियम अ‍ॅप्सचा एक्सेस मिळेल. याचबरोबर या सेवेत तुमच्या अ‍ॅप्सवर जाहिराती देखील दिसणार नाहीत.

यामध्ये तुम्हाला दर महिन्याला नवीन प्रिमियम अ‍ॅप्स आणि गेमिंग सेवा मिळेल. गुगल प्ले पास (Google Play Pas) असे या सेवेचे नाव आहे.

ही सेवा युजर्स आपल्या फॅमिलीतील पाच मेंबर्सबरोबर शेअर करू शकतील. यामध्ये युजर्सला Terraria, Monument Valley, Risk, Star Wars: Knights of the Old Republic आणि AccuWeather सारखे अ‍ॅप्स आणि गेम्स एक्सेस करायला मिळतील. तसेच, युजर्सला काही गेम्सवर ऑफर्स देखील मिळतील.

ही सर्विस तुम्हाला गुगल प्ले अ‍ॅपच्या नवीन टॅबमध्ये मिळेल. तेथून तुम्ही ही सेवा स्बस्क्राईब करू शकता. स्बस्क्रिप्शन करताचा प्ले पास तिकीट अनलॉक होइल. या सेवेत तुम्ही एड फ्री अ‍ॅप्स आणि गेम्सचा आनंद घेऊ शकाल.

 

Leave a Comment