‘मुन्नाभाई’सोबत सिनेसृष्टीत पदार्पण करणार माही


गेल्या दोन महिन्यांपासून भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनी क्रिकेटपासून लांब आहे. विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंड विरोधात धोनीने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर धोनी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गैरहजर राहिल्यामुळे धोनी निवृत्ती घेणार का, अशा चर्चा जोर धरत आहेत. पण अद्याप याबाबत काही अधिकृत माहिती धोनीने दिलेली नाही.

दुसरीकडे, जरी धोनी क्रिकेटपासून लांब असला तरी आता तो चक्क चित्रपटांद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्यामुळे क्रिकेटचे मैदान सोडून धोनी चित्रपटांमध्ये दणक्यात एण्ट्री करण्यासाठी तयार झाला आहे. बॉलिवूडचा मुन्नाभाई अर्थात मॅन संजय दत्तसोबत महेंद्रसिंग धोनी चित्रपटात काम करताना दिसणार आहे. संजय दत्तसोबत वायकॉम 18 स्टुडीओ प्रोडक्शन चित्रपट करणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन यमला पगला दीवाना फेम दिग्दर्शक समीर कर्णिक करणार आहे. या चित्रपटाचे नाव डॉगहाऊस असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तीन अंडरडॉग्सच्या संबंधित या चित्रपटाची कथा असणार आहे. या चित्रपटाच्या प्रमुख भुमिकेत बरेच मोठे कलाकार असणार आहेत. संजय दत्त हा या चित्रपटात प्रमुख भुमिकेत असणार आहे. यासंबंधित इतर कलाकारांची निवड दिग्दर्शक करणार आहेत. या चित्रपटात संजय दत्तसोबत सुनील शेट्टीही असणार आहे. दरम्यान महेंद्रसिंग धोनी या चित्रपटामध्ये पाहुण्या कलाकाराची भुमिका साकारणार आहे. याबाबत अधिकृत माहिती निर्माते पुढच्या काही दिवसांत देतील.

Leave a Comment