धमण्यांच्या मदतीने 0.3 सेंकदामध्ये पटणार मनुष्याची ओळख


चीनी कंपनी मील्कसने असे तंत्रज्ञान शोधले आहे ज्याच्या मदतीने हाताच्या नसांद्वारे मनुष्याची ओळख केली जाणार आहे. हे तंत्रज्ञान फेस रिकग्निशन पेक्षाही अधिक जलद आहे. हे तंत्रज्ञान केवळ 0.3 सेंकदामध्ये नसांद्वारे मनुष्याची ओळख पटवून देईल. कंपनीने याचे नाव एअरवेव ठेवले आहे. कंपनीने दावा केली आहे की, इतर बायोमेट्रीक प्रणाली पेक्षा हे प्रणाली अधिक चांगली व सुरक्षित आहे.

कंपनीनुसार, जेव्हा फेस रिक्गिनिशनद्वारे मनुष्याच्या चेहऱ्याची ओळख केली जाते, त्यावेळी चेहऱ्यावरील 80 ते 280 फीचर पाइंट्स तपासले जातात. मात्र एअरवेव 0.3 सेंकदामध्ये तळहातावरील एक मिलियन पेक्षा अधिक मायक्रो-फिचर पॉइंट्स स्कॅन करते.

कंपनीचे फाउंडर जेल क्यूंगल यांनी सांगितले की, त्वचेच्या खालील प्रमुख नसा आणि पेशी या प्रत्येकामध्ये वेगळ्या असतात. एअरवेव आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर आधारित आहे. ते तळहातावरील सुक्ष्म आणि प्रमुख नसा ते पेशी व्यवस्थित स्कॅन करू शकते.

चीनमध्ये मोठ्या प्रमाणात काम हे कॅशलेस आणि फेस रिकग्निशनद्वारेच होते. चेहऱ्याची ओळख पटवण्यासाठी क्यूआर कोड आणि पासवर्ड सिस्टमचा वापर केला जात आहे.

कंपनीचे फाउंडर जेल क्यूंगलू यांनी सांगितले की, एअरवेवला 2018 मध्ये लाँच करण्यात आले होते. गेली एक वर्ष त्याचे परिक्षण सुरू होते व याला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. मील्कस कंपनी लवकरच हे तंत्रज्ञान मेट्रो ऑपरेटर्ससाठी तयार करणार आहेत.

Leave a Comment