अ‌ॅमी जॅक्सनने दिला गोंडस मुलाला जन्म


गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियात अभिनेत्री अ‌ॅमी जॅक्सनच्या प्रेग्नंसीच्या चर्चा होत्या. तिने बाळाच्या आगमनापूर्वी आयोजित केलेले ‘बेबी शॉवर’ खास चर्चेत राहिले. बॉयफ्रेन्ड जॉर्ज पानायियोतो याच्यासोबत अ‌ॅमी बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. प्रेग्नंसीनंतर काही महिन्यांपूर्वीच एमीचा साखरपुडा पार पडला. आता तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. तिच्या बाळाची छबीही तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

View this post on Instagram

Our Angel, welcome to the world Andreas 💙

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on


प्रेग्नंसीदरम्यानही अ‌ॅमीने तिचे प्रत्येक अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर केले. तिचा प्रेग्नंसीचा काळ तिने खूप एन्जॉय केला. तिने विविध व्हिडिओ, फोटोशूटही शूट केले होते. एमीने आता एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. अँड्रियास असे त्याचे नाव ठेवण्यात आले आहे. डिलिव्हरीनंतरचा एक फोटो तिने शेअर केला. या फोटोमध्ये तिच्या आणि जॉर्जच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे पाहायला मिळतो.

तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अ‌ॅमीने तिच्या बाळाचा फोटो शेअर करुन त्याचे स्वागत केले आहे. तिच्यासाठी हा क्षण खूप खास आहे. तिने प्रेग्नंसीदरम्यान सिनेसृष्टीपासून लांबच राहणे पसंत केले. त्यासोबतच आपल्या मातृत्वाचा ती सध्या आनंद घेत आहे. लवकरच ती जॉर्जसोबत लग्न थाटणार आहे. आता बाळाच्या आगमनाने दोघांच्याही आयुष्यात आनंद बहरला आहे.

Leave a Comment