एअरटेल आणि जिओमध्ये जुंपले ‘मिस कॉल वॉर’


देशातील अग्रण्य दुरसंचार कंपन्या भारती एअरटेल आणि रिलायंस जिओ यांनी याआधीही एकमेकांवर अनेकवेळा आरोप-प्रत्यारोप केले आहेत. आता पुन्हा या दोन्ही कंपन्या समोरासमोर आल्या असून, दोन्ही कंपन्यांमध्ये मिस कॉलवरून वाद सुरू आहे.

एअरटेलने प्रतिस्पर्धी कंपनी जिओवर आरोप केले आहेत की, जिओने फोनची रिंग जाणूनबुजून कमी केली आहे. जेणेकरून कॉल, मिस कॉलमध्ये बदलतो व समोरील व्यक्तीला कॉल बॅक करावा लागतो.

या आरोपानंतर जिओने देखील एअरटेलवर पलटवार केला आहे. जिओने एअरटेलवर वॉइस कॉलसाठी अधिक पैसे वसूल करणे आणि सिस्टिमबरोबर छेडछाड करण्याचा आरोप केला आहे. याचबरोबर जिओने म्हटले आहे की, त्यांनी रिंग टाइम 20 सेंकद निश्चित केलेला आहे. हा टाइम ग्लोबल ऑपरेटर देखील फॉलो करतात.

जिओने म्हटले आहे की, त्यांच्या नेटवर्कवर येणारे एक चतृतांश फोन हे मिस कॉल असतात. एअरटेलने वॉयस कॉलिंगचे दर वाढवल्याने असे होते. यामुळे ग्राहक जिओच्या नेटवर्कवर केवळ मिस कॉल देतात व जिओचे ग्राहक पुन्हा कॉल बॅक करतात. अशावेळी जिओ इंटरकनेक्ट कॉलसाठी एअरटेलला पैसे देते.

Leave a Comment