अ‍ॅपल वॉचमुळे वाचले वडिलांचे प्राण, मुलाने मानले अॅपलचे आभार


अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील एका व्यक्तीने वडिलांचे प्राण वाचवल्याबद्दल फेसबुक पोस्ट लिहित अ‍ॅपल वॉचला श्रेय दिले आहे. एका युजरने या व्यक्तीची पोस्ट ट्विटरवर शेअर केली असून, अ‍ॅपलचे सीईओ टीम कूक यांनी देखील हे ट्विट लाइक केले आहे.

गेड ब्रूडेट माउंटेन बाइकिंग करत असताना रिव्हरसाइड स्टेट पार्क येथे ठरलेल्या ठिकाणी वडिलांची वाट बघत होता. त्याचवेळी त्याला वडिलांच्या अ‍ॅपल वॉचवरून संदेश आला. त्यात हार्ड फॉल (जोरात पडले) असे लिहिले होते. वॉचने त्याच्या वडिलांचे लोकेशन देखील पाठवले.

त्यानंतर वॉचवरून वडिलांना सेक्रेड हर्ट मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आल्याचे देखील अपडेट गेडला येत होते.

गेड ब्रुडेटने फेसबुकवर लिहिले की, लोकेशनवर पोहचलो तेव्हा डॅड तेथे नव्हते. त्यांचे लोकेशन मेडिकल सेंटर दाखवत होते. त्यांची बाइक पलटी झाल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.

वॉचने एमर्जेन्सी नंबर 911 वर संदेश पाठवला आणि 30 मिनिटांमध्ये रूग्णवाहिका ग्रेडच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी आली.

ग्रेडने लिहिले की, कमालचे तंत्रज्ञान आहे, हे माझ्याकडे आहे याचा मला खरचं आनंद होत आहे. याआधी देखील अनेकांनी अ‍ॅपल वॉचमुळे त्यांचे प्राण वाचल्याचा दावा केलेला आहे.

Leave a Comment