जगातील सर्वात जुनी हॉलिडे कंपनी ‘थॉमस कुक’ बंद

जगातील सर्वात मोठी ट्रॅव्हल कंपनी थॉमस कुक रविवारी रात्री बंद झाली. 178 वर्ष जुन्या ब्रिटिश टूर कंपनीला अनेक दिवसांपासून फंड मिळत नव्हता. कंपनीने म्हटले आहे की, त्यांच्याकडे कंपनी बंद करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता.

कंपनी बंद झाल्याने 22 हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. यामध्ये युकेच्या 9 हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कंपनी बंद झाल्याने कर्मचाऱ्यांबरोबर ग्राहक, सप्लायर आणि कंपनीच्या भागिदारांवर देखील परिणाम होणार आहे. यासाठी थॉमस कुकचे चीफ एक्झिक्यूटिव पीटर फँकहॉजर यांनी ग्राहक, सप्लायर्स, कर्मचारी आणि भागीदारांची माफी मागितली आहे. कंपनीला अनेक दिवसांपासून फंड मिळत नव्हता. बँकांच्या एका समितीने कंपनीला अतिरिक्त फंड देण्यास देखील नकार दिला होता.

मागील महिन्यात थॉमस कुकने रिकॅपिटलायझेशन संबंधित योजनेबद्दल चीनचे शेअरहोल्डर फोसुनबरोबर करण्यात आलेल्या कराराच्या अटी मान्य केल्या होत्या. हा करार 1.1 अब्ज डॉलरचा होता. रॉयल बँक ऑफ स्कॉटलँडने देखील कंपनीला अतिरिक्त 20 करोड पाउंड फंड देण्यास नकार दिला होता.

Leave a Comment