स्टोन फिशच्या नुसत्या स्पर्शाने कुजते माणसाची त्वचा


जगभरात अनेक विषारी प्राणी आहेत. सागरी जीवन तर अद्भूततेने नटलेले आहे पण तेथेही विषारी प्राणी आहेतच. सर्वसाधारणपणे कोब्रा हा नाग सर्वाधिक विषारी मानला जातो. हा नाग चावल्यावर काही मिनिटात माणसाचा मृत्यू ओढवतो. पण समुद्रात आढळणारा स्टोन फिश हा मासाही तसाच विषारी असून त्याचा नुसता स्पर्श झाला तरी माणसाची त्वचा कुजू लागते. हा मासा अगदी दगडासारखा दिसतो म्हणून त्याचे नाव स्टोन फिश.

पृथ्वीच्या मकरवृत्ताजवळ असलेल्या समुद्रात हा मासा सापडतो. तो अगदी दगडासारखा दिसतो त्यामुळे चटकन तो मासा आहे हे लक्षात येत नाही. ह मासा ०.५ सेकंद वेगाने त्याच्या शरीरातील विष बाहेर फेकतो. त्यामुळे त्याला नुसता स्पर्श झाला तरी माणसाचा मृत्यू ओढवतो असे समजते. या माशाचे विष इतके जहाल असते की समजा शहराला पाणी पुरविणाऱ्या तलावात त्याचे काही थेंब मिसळले तर अनेक माणसांच्या मृत्यू ओढवू शकतो. स्टोन फिशचे आतील शरीर अगदी मऊ असते पण बाहेरचे कवच खुपच कठीण असते. त्याच्या शरीरातील रसायन म्हणजेच एक प्रकारचे विष असते. माणसाला हा मासा चावला तर माणसाचे शरीर ताबडतोब कुजायला लागते आणि त्यातून माणसाचा मृत्यू ओढवतो.

Leave a Comment