देशातील सर्वात सामर्थ्यशाली महिलांच्या यादी अनुष्का शर्माचा समावेश


‘फॉर्च्यून इंडिया २०१९’ च्या यादीमध्ये भारतातील सामर्थ्यशाली महिला म्हणून बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा समावेश झाला आहे. फॉर्च्यून इंडिया’ने ही यादी अलिकडेच जाहीर केली. तब्बल ५० व्यक्तींच्या नावाचा यामध्ये समावेश आहे. बॉलिवूडमधील एकमेव अभिनेत्री अनुष्काची या यादीमध्ये वर्णी लागली आहे.

अनुष्काला ‘फॉर्च्यून इंडिया’च्या यादीत ३९ क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. ही यादी भारतातील सर्वात सामर्थ्यशाली महिलांच्या वार्षिक रँकिंग, त्याचे व्यापार कौशल्य आणि सामाजिक तसेच सांस्कृतिक प्रभाव या सर्व गोष्टींवरुन जाहीर करण्यात येते. अनुष्काचा परिचयही यामध्ये देण्यात आला आहे.


२००८ साली ‘रब ने बनादे जोडी’ या चित्रपटातून अनुष्का शर्माने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने अल्पावधीतच बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थान पटकावले. आजवर तिने बरेच सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहे. तिच्या अभिनयासोबतच सोशल मीडियावरही ती चर्चत असते.

सोशल मीडियावर विराट कोहलीसोबतचेही तिचे बरेच फोटो व्हायरल होत असतात. निर्मिती क्षेत्रातही अनुष्काने पदार्पण केले आहे. तिच्या निर्मितीखाली ‘एनएच १०’, ‘फिल्लोरी’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय डिजीटल प्लॅटफॉर्मवरही तिने एन्ट्री घेतली आहे. अॅमॅझॉन प्राईमसाठी ती एका वेबसीरिजची निर्मिती करत आहे.

Leave a Comment