‘दबंग ३’मधील सई मांजरेकरची पहिली झलक


सध्या ‘दबंग ३’ चित्रपटाची तयारी बॉलिवूडचा भाईजान सलमान खान करत आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबतच महेश मांजरेकर यांची मुलगी सई ही देखील या चित्रपटात झळकणार आहे. सलमानने अलिकडेच झालेल्या आयफा अवार्ड्स सोहळ्यात सईची ओळख करुन दिली. सोशल मीडियात त्यांचे बरेच फोटोही व्हायरल झाले. आता तिची आणि सलमानची ‘दबंग ३’ चित्रपटातील पहिली झलकही समोर आली आहे. तिच्यासोबतचा फोटो सलमान खानने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सईचा हा पदापर्णीय चित्रपट असून ती यामध्ये सलमानच्या पुर्वाश्रमीच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे. मागील बऱ्याच दिवसापासून तिच्या पदार्पणाच्या चर्चा सुरू होत्या. पण या चित्रपटातील तिचा कोणताही फोटो समोर आला नव्हता. ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यानंतर सईची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळाली.

View this post on Instagram

On location #dabangg3 . . . @saieemmanjrekar

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on


‘दबंग’ चित्रपटात महेश मांजरेकरांनी भूमिका साकारली होती. आता ‘दबंग ३’मध्ये त्यांची मुलगी भूमिका साकारताना दिसणार असल्यामुळे सलमान आणि सईची केमेस्ट्री कशी असेल, याची चाहत्यांना आतुरता आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभूदेवा करत आहे. तर, या चित्रपटाची निर्मिती अरबाज खान करत आहे. दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप देखील यामध्ये खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट डिसेंबर महिन्यात २० तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Leave a Comment