आता मोबाईल कंपन्यांना सरकारला द्यावा लागणार डिव्हाईसचा युनिक कोड

दुरसंचार विभागाने देशातील स्मार्टफोन कंपन्यांना फोनचा युनिक कोड म्हणजेच आयडेंटिफिकेशन नंबर पुढील दोन महिन्यात सरकारला देण्याचे आदेश दिले आहेत. विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, युनिक कोड घेऊन आम्ही लोकांचा डाटा सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. स्मार्टफोन कंपन्या देखील या निर्णयाशी सहमत आहेत.

युनिक कोड काय असतो ?

स्मार्टफोनचा युनिक कोड 15 आकडी असतो. या कोडला इंटरनॅशनल मोबाइल एक्विपमेंट आयडेंटिटी देखील म्हटले जाते. जीएसएमए (GSMA) प्रत्येक फोनचा युनिक कोड निश्चित करत असते.

केंद्र सरकारने काही दिवसांपुर्वीच एक वेब पोर्टल लाँच केले असून, या पोर्टलद्वारे हरवलेले अथवा चोरीला गेलेले स्मार्टफोन शोधता येतील.

फोन ट्रॅक करण्यास मिळेल मदत –

दुरसंचार विभाग युनिक कोडद्वारे फोनच्या हालचालींवर लक्ष ठेवेल. जर फोनद्वारे कोणतेही चुकीचे कार्य केले जात असेल तर विभागाकडून त्वरित डिव्हाईस ब्लॉक अथवा ट्रेस केले जाईल.

दुरसंचार विभाग अनेक दिवसांपासून आयडेंटिटी रजिस्टरवर कार्य करत आहे. यासाठी विभागाने टेक कंपन्यांना देखील सहभाग घेण्यास सांगितले आहे.

Leave a Comment