आता कानाने अनलॉक करता येणार स्मार्टफोन


स्मार्टफोन युजरचे ऑथेंटीफीकेशन प्रोसेस मध्ये काही वर्षात बरेच बदल झाले आहेत. आता पासवर्ड, पिनची जागा फिंगरप्रिंट स्कॅनर, फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाने घेतली असली तरी भविष्यात त्यात आणखी सुधारणा होणार हे नक्कीच आहे. अॅपलने पाम स्कॅनर डिव्हाईस साठी पेटंट घेतले आहे. त्याचेच पुढचे पाउल म्हणजे संशोधकांनी नवीन बायोमेट्रिक ऑथेंटीफीकेशन तंत्र विकसित केले आहे. यात कानाच्या मदतीने स्मार्टफोन अनलॉक करता येणार आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ बफेलो मधील संशोधक प्रो. जानपेंग जीन आणि त्यांच्या टीमने ईअर एको या नावाने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यात माणसाच्या कानाच्या आतील पोकळीच्या विशिष्टपूर्ण रचनेचा उपयोग करून घेतला गेला आहे. या कानाच्या पोकळीचा स्कॅन करून वायरलेस ईअरबडच्या सहाय्याने युजर त्याची ओळख पटवेल. या तंत्राने प्रोटोटाईप स्मार्टफोन अनलॉक करण्यात ९५ टक्के यश मिळाले आहे असा दावा केला जात आहे.

जेव्हा कुणा माणसाच्या कानात आवाज शिरतो, तेव्हा तो आत पसरतो, रीफ्लेक्ट होतो आणि कानाच्या पोकळीत शोषला जातो. ही प्रोसेस युनिक ऑडीओ सिग्नेचर निर्माण करते आणि मायक्रोफोनच्या सहाय्याने रेकॉर्ड करता येते. संशोधकांनी यात नॉइस आणि बाकी आवाज कॅन्सल करून रेकॉर्ड केले आणि फोन अनलॉक झाला. प्रत्येक माणसाच्या कानाची घडण वेगळी असते आणि त्याचा फिंगरप्रिंट प्रमाणे युनिक पॅटर्न असतो. या तंत्रामुळे युजरला फोन अनलॉक करताना स्क्रीन स्वाईप करणे, इनपुट वा व्हॉइस कमांड देण्याची गरज नाही.

या तंत्राने पेमेंट करणेही शक्य असून युजरला पासवर्ड किंवा फिंगरप्रिंट रजिस्टर करण्याची गरज राहणार नाही असेही या संशोधकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment