ह्युस्टनमध्ये पंतप्रधानांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत


वॉशिंग्टन – ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमाचे आयोजन अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये करण्यात आले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या कार्यक्रमाला उपस्थित होते. पंतप्रधानांचे कार्यक्रमातील अमेरिकी नागरिकांसह हजारो भारतीय नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. एन.आर.जी. स्टेडीयमवर यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात येत होती.

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पंतप्रधानांच्या या कार्यक्रमासाठी करण्यात आले होते. यावेळी खास मराठमोळ्या पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले. मोदींचे स्टेडियममध्ये आगमन होताच ढोल-ताशे वाजवण्यास सुरुवात झाली. ढोल ताशांचे सूर कानी पडताच अनेकांना नाचण्याचा मोह आवरला नाही. तसेच उपस्थितांनी यावेळी ढोल ताशावर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. तसेच भाषण संपल्यानंतरही उपस्थित लोकांनी ढोल-ताशावर ठेका धरला.

उपस्थित सर्व नागरिकांना मोदींनी हात उंचावून अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्व नागरिकांमध्ये उत्साह संचारला. यादरम्यान, महात्मा गांधी यांच्या १५० जयंती निमित्त ‘वैष्णव जन’ हे भजन सादर करण्यात आले. भारतीय व अमेरिकी गायकांचा यामध्ये समावेश होता. या भजनाद्वारे महात्मा गांधींना आदरांजली अर्पण करण्यात आली.

Leave a Comment