कोण आहे ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमात राष्ट्रगीत गाणारा 16 वर्षीय स्पर्श शाह ?

अमेरिकेत झालेल्या हाउडी मोदी कार्यक्रमात भारतीय राष्ट्रगीत गाणाऱ्या स्पर्श शाहची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.मूळ भारतीय असलेल्या 16 वर्षीय स्पर्श शाहला गेली अनेक दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची इच्छा होती, अखेर रविवारी हाउडी मोदी कार्यक्रमात त्याची ही इच्छा पुर्ण झाली.

16 वर्षीय स्पर्शला ऑस्टियोजिनेसिस इम्पर्फेक्टा हा दुर्मिळ आजार आहे. या आजारात हाडे कमजोर असतात व सहज तुटतात. ह्युस्टन येथील हाउडी मोदी या त्याने कार्यक्रमात स्पर्शने पंतप्रधान मोदी, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि 50 हजारांपेक्षा अधिक लोकांसमोर भारताचे राष्ट्रगीत गायले.

अमेरिकेच्या न्युजर्सीमध्ये राहणारा स्पर्श शाह एक गायक, रॅपर आणि मोटिवेशनल स्पीकर देखील आहे.

कार्यक्रमामध्ये परफॉर्म करण्याआधी स्पर्शने सांगितले की, एवढ्या लोकांसमोर राष्ट्रगीत गाणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मॅडिसन स्केवअर गार्डनमध्ये मी पहिल्यांदा पंतप्रधान मोदींना बघितले होते. मला त्यांना भेटायचे होते, मात्र मी केवळ त्यांना टिव्हीवरच बघू शकत होतो. मात्र देवाच्या कृपेने मी आता त्यांना भेटू शकणार आहे.

हाउडी मोदी कार्यक्रमात परफॉर्म करणाऱ्या 400 कलाकारांपैकी स्पर्श एक आहे.

12 वर्षाचा असताना स्पर्शने प्रसिध्द गायक एमिनेमचे ‘नॉट अफ्रेड’ हे गाणे गायले होते. तेव्हापासून त्याला प्रसिध्दी मिळाली. हे गाण्याला 65 मिलियन पेक्षा अधिक व्यूज आले आहेत. स्पर्शच्या आयुष्यावर 2018 मध्ये ‘ब्रिटल बोन रॅपर’ नावाने डॉक्युमेंट्री देखील बनली आहे.

Leave a Comment