अनेक बड्या मोटार कंपन्यांनी भारतात आहेत प्लांट


भारत आज जगातील मोठ्या ऑटो मार्केट मधील एक देश म्हणून ओळखला जात आहे आणि आज जगातील बहुतेक बड्या ब्रांडच्या कार्स भारतात दिसतात. अनेक बड्या मोटार कंपन्यांनी भारतात त्यांचे प्लांट सुरु केले आहेत. मात्र सर्वाधिक मोठ्या क्षमतेचे कार कारखाने भारतात पाहायला मिळत नाहीत. अश्याच काही प्रसिद्ध कारखान्यांची माहिती आमच्या वाचकांसाठी

वोक्सवॅगन एजीचे मुख्यालय जर्मनीच्या वोस्क्सबर्ग शहरात असून येथे कंपनीचा जगातील सर्वात मोठा उत्पादन कारखाना आहे. हा कारखाना ७ कोटी चौरस फुट परिसरात पसरलेला आहे.

इलेक्ट्रिक कार क्षेत्रात आघाडीवर असलेल्या टेस्लाची गिगा फॅक्टरी उभारण्याचे काम २०१६ मध्ये सुरु झाले असून त्याचे ३० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. हा कारखाना ४९ लाख चौरस फुट परिसरात बांधला जात आहे.

बुगाटी या लोकप्रिय आणि महागड्या कार्सचा उत्पादन प्रकल्प फ्रांस मध्ये असून तो जगातील सर्वात स्वच्छ आणि आधुनिक कारखाना मानला जातो. फ्रांसच्या छोट्याश्या मुल्शाइम शहरात हा कारखाना आहे.

पीएसए व्हीगो ही १९५९ पासून सक्रीय असलेली कंपनी. दरवर्षी या कारखान्यात ४०६५०० वाहने तयार होतात. या कारखान्याचा एकूण परिसर ६९ लाख चौरस फुट आहे.

जर्मनीच्याच मर्सिडीज बेंझ या लग्झरी कार्स बनविणाऱ्या कारखान्याचा परिसर ३१,८१७.५२० चौरस फुटाचा असून हा कारखाना १०४ वर्षे सुरु आहे.

Leave a Comment