महिलांना हे बोट दाखवल्यास येईल तुरुंगात जाण्याची वेळ!


नवी दिल्ली – भारतात महिलांच्या सुरक्षितेते दृष्टीने अनेक कायदे अस्तित्वात आले आहेत. त्यातच आपल्या देशात सध्या सार्वजनिक ठिकाणी किंवा कार्यालयात महिलांकडे पाहून अश्लील हावभाव करणे हा देखील गुन्हा मानला जातो. या नियमात आता आणखी एका गोष्टीचा समावेश करण्यात आला आहे. महिलांना जर यापुढे ‘मिडल फिंगर’ दाखवले तर तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते.

दिल्ली न्यायालयाने यासंदर्भात नुकताच एक निर्णय दिला आहे. अशा प्रकारे महिलांकडे पाहून हावभाव करणे हे त्यांच्या सन्मानाविरुद्ध असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 21 मे 2014 रोजी पीडित महिलेने दिराविरोधात तक्रार दाखल केली होती. तिच्याकडे दिराने पाहून विचित्र हावभाव करत मिडल फिंगर दाखवले होते. संतप्त महिलेने या प्रकारामुळे त्याला मारहाण देखील केली होती.

पोलिसांनी 8 ऑक्टोबर 2015 रोजी संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 509 आणि 323 नुसार गुन्हा दाखल केला होता. न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. संबंधित व्यक्तीला न्यायालयाने 3 वर्षाची शिक्षा आणि दंड देखील केला.

स्वत:चा बचाव करताना आरोपीने असा दावा केला होता की, हा जमीनीचा वाद आहे आणि संबंधित महिलेने खोटा आरोप केला आहे. पण आरोपीने प्रत्यक्षात महिलेकडे पाहून मिडल फिंगर (मधले बोट) दाखवले होते आणि अश्लील शब्द वापरले होते. न्यायालयाला सुनावणी दरम्यान जमीनीचा कोणताही वाद असल्याचे आढळून न आल्यामुळे न्यायालयाने त्याला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.

Leave a Comment