मोबाईल अ‍ॅपने करणार 2021ची जनगणना – अमित शहा

भारताची पुढील जनगणना ही 2021 मध्ये होणार आहे. यानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2021 ची जनगणना ही डिजिटल असेल असे म्हटले आहे. जनगणनेचा डाटा जमा करण्यासाठी मोबाईलचा वापर देखील केला जाईल. याचबरोबर त्यांनी पासपोर्ट, आधार कार्ड, मतदान कार्ड, बँक खाता आणि ड्रायव्हिंग लायसेंससाठी मल्टीपर्पज ओळख पत्राची कल्पना देखील सुचवली आहे. हे एकच ओळखपत्र इतर कार्डचे काम करेल.

भारताची मागील जनगणना 2011 साली झाली होती. यावेळी भारताची लोकसंख्या 121 करोड होती. 2021 मध्ये होणारी जनगणना ही जगातील सर्वात मोठी गणना असणार आहे.

2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये मोबाईल अॅपचा वापर करण्यात येईल. तसेच सर्व ओळख पत्रांसाठी एक मल्टीपर्पज ओळख पत्राची कल्पना देखील अमित शहा यांनी सुचवली. याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूची आपोआप नोंद सिस्टिममध्ये होईल अशी सुविधा देखील असेल. मोजणीसाठी वापरण्यात येणारे अॅप हे स्वदेशी असेल.

पहिल्यांदाच जनगणनेमध्ये ओबीसी समाजाचा डाटा देखील गोळा केला जाणार आहे. 12 हजार करोड रूपये या जनगणनेसाठी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती देखील अमित शहा यांनी दिली.

भारतातील 140 वर्षांच्या जनगणनेच्या इतिहासात पहिल्यांदाच डिजिटल पध्दतीने माहिती गोळा केली जाणार आहे. तसेच लोकांना अॅपचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. यासाठी 33 लाख कर्मचाऱ्यांची जनगणना करणाऱ्यांसाठी नेमणूक करण्यात येईल. ते घरोघरी जाऊन माहिती गोळा करतील.

तसेच, जनगणना ही दोन टप्प्यात केली जाईल. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ऑक्टोंबर 2020 पासून व इतर ठिकाणी मार्च 2021 पासून जनगणना करण्यात येईल.

 

Leave a Comment