धोनीच्या मोठ्या विक्रमाशी हिटमॅन रोहितची बरोबरी


बंगळुरू – आफ्रिकेने भारत विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात भारताला पराभूत केले. फक्त ९ धावांची खेळी करणाऱ्या रोहित शर्माने या सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

रोहितने टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक सामने खेळणाऱ्या धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आत्तापर्यंत ९८ टी-२० सामने धोनीने खेळले आहेत. २००६ मध्ये त्याने पहिला सामना खेळला होता. तर, २००७ मध्ये पदार्पण करणाऱ्या रोहितचाही हा ९८ वा टी-२० सामना होता.

आत्तापर्यंत ९८ टी-२० सामन्यात हिटमॅनने ४ शतके आणि १७ अर्धशतकांसहित २४४३ धावा चोपल्या आहेत. तर, धोनीने २ शतकांसह १६१७ धावा केल्या आहेत. या दोघानंतर, सुरेश रैनाने ७८, विराटने ७३, युवराजने ५८ आणि शिखर धवनने ५६ सामने खेळले आहेत. टी-२० मध्ये सर्वात जास्त सामने खेळण्याचा मान पाकिस्तानच्या शोएब मलिकच्या नावावर आहे. त्याने १११ सामने खेळले आहेत. त्यानंतर शाहिद आफ्रिदीने ९९ सामने खेळले आहेत.

Leave a Comment