या महिन्याच्या शेवटी सलग पाच दिवस बँका बंद


नवी दिल्ली – केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बळकटीकरणासाठी त्यांच्या विलीनाकरणाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी याविरोधात दोन दिवसीय संपाची घोषणा केली आहे. परिणामी बँका २६ आणि २७ सप्टेंबर रोजी बंद राहणार आहेत. त्यानंतर २८ आणि २९ सप्टेंबर रोजी अनुक्रमे शनिवार आणि रविवार असल्याने बँका बंद असतील. तर, 30 सप्टेंबर रोजी अर्धवार्षिक लेखा व्यवहारांच्या पूर्ततेसाठी कोणतेही व्यवहार होणार नसल्यामुळे बँकांची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एक ऑक्टोबरची वाट पाहावी लागेल. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी गांधी जयंतीमुळे बँकांना सुट्टी असणार आहे. दरम्यान, बँक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सलग सुट्ट्यांचे नियोजन करुन २६ आणि २७ सप्टेंबर रोजी जाणीवपुर्वक संप पुकारल्याचा आरोप ग्राहक संघटनांनी केला आहे.

Leave a Comment