जाहिरातीतून कमाईत अमीर टॉपवर, विकीचीही जोरदार भरारी


जाहिरात ही ६५ वी कला म्हणून ओळखली जाते. कोणताही उत्पादक त्याच्या वस्तूचे उत्पादन वाढावे म्हणून जाहिरातीचा आधार घेतो आणि त्यासाठी जनमानसात लोकप्रिय असलेल्या व्यक्तीची जाहिरातीसाठी निवड करतो. यात बॉलीवूड कलाकाराचे योगदान लक्षणीय असून जेवढा कलाकार लोकप्रिय तेवढा त्याचा रेट अधिक हे समीकरण येथेही आहे. हे लोकप्रिय कलाकार चित्रपटांसाठी तगडे मानधन घेतातच पण कधी कधी त्यापेक्षाही अधिक कमाई ते जाहिराती करून करतात. यात आमीर खान आघाडीवर असून तो एका जाहिरातीसाठी ११ कोटी रुपये घेतो असे समजते.

या संदर्भात एक ताजा रिपोर्ट नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार जाहिरातीसाठी सर्वाधिक मानधन आमीर खान घेतो तर त्याच्या खालोखाल किंग खानचा नंबर असून तो एका जाहिरातीसाठी ९ कोटी घेतो. अमिताभ बच्चन ८ कोटी तर अक्षयकुमार ७ कोटी घेतो. या यादीत उरी फेम विकी कौशल वेगाने प्रगती करून वरच्या क्रमांकाकडे वाटचाल करत आहे. तो सध्या एका जाहिरातीसाठी ३ कोटी रुपये घेतो. विकी बॉलीवूड मध्ये वरील कलाकारांच्या तुलनेने नवीन आहे आणि तरीही त्याच्या मानधनाचा आकडा इतका आहे. नवीन कलाकारात आयुष्मान खुराना, टायगर श्रॉफ यांनी त्याचे चित्रपट यशस्वी होताच फी वाढवली आहे. ते जाहिरातीसाठी अडीच कोटी घेतात तर राजकुमार राव दीड कोटी रुपये घेतो.

अनेक वर्षे जाहिरात क्षेत्रात काम केलेले जॉन मॅथ्यु मथान सांगतात, जाहिरात क्षेत्रात पुरुष कलाकाराच्या बाबतीत सतत बदल होताना दिसतात. आता लोक लुक, ग्रीक गॉड ऐवजी यशस्वी कलाकार अधिक पसंत करतात. सध्या विकी कौशल खुपच डिमांड मध्ये आहे. उरीच्या यशानंतर अनेक कंपन्या त्याच्या उत्पादनाच्या जाहिराती विकी कौशल कडून करून घेण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत.

Leave a Comment