बापरे ! 50 वर्षात तब्बल 3 अब्ज पक्षी झाले लुप्त

उत्तर अमेरिकेमध्ये मागील 50 वर्षांमध्ये जवळपास 3 अब्ज पक्षांच्या संख्येत घट आली आहे. अमेरिका आणि कॅनेडामध्ये 5 दशकांपुर्वी 10.1 अब्ज पक्षी होते. यात घट होऊन ही संख्या 7.2 अब्ज झाली आहे. ही आकडेवारी कॉर्नेल युनिवर्सिटीच्या रिसर्चमध्ये समोर आली आहेत. हा रिसर्चसायन्स’ जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

रिसर्चरनुसार, हवामानाच्या रडारचा वापर करून पक्ष्यांची आकडेवारी गोळा केली आहे. 1970 पासून आतापर्यंत पक्ष्यांवर झालेल्या 13 सर्वेक्षणामधील 529 पक्ष्यांचा ट्रेंड समजण्यासाठी कॉम्प्यूटर मॉडेलची देखील मदत घेण्यात आली.

रिसर्चर रूबेगाने सांगितले की, पिकांना नुकसान पोहचवणारे, एंसोफिलाइटिस सारखे आजार पसरवणारे किडे खाणारे 3 अब्ज पक्षी लुप्त झाले आहेत. हा एक विचार करण्याचा विषय आहे. सर्वात जास्त परिणाम सहज ओळखता येणाऱ्या चिमण्यांवर झाला आहे. सर्व पक्ष्यांवर याचा परिणाम झालेला नसून, ब्लूबर्डची संख्या आहे तशीच आहे.

पक्ष्यांची संख्या कमी होण्याचे कारण त्यांना राहण्यासाठी जागा न मिळणे हे आहे. 2015 च्या एका रिसर्चनुसार, अमेरिका आणि कॅनेडामध्ये पक्षी मरण्याचे मोठे कारण मांजर आहे. मांजरी दरवर्षी 2.6 करोड पक्ष्यांना मारतात. याचबरोबर 62.4 करोड पक्षी खिडक्या आणि 2.14 करोड पक्षी कारला धडकून मरण पावतात.

रिसर्चरचे म्हणणे आहे की, पक्ष्यांची संख्या वाढावी यासाठी मांजरीना घरात ठेवले पाहिजे. तसेच पिकांवर रासायनिक खतांचा वापर कमी करावा.

Leave a Comment