या व्यक्तीने 83 व्या वर्षी घेतली इंग्लिशमध्ये मास्टर डिग्री

शिक्षणासाठी कोणत्याही वयाची अट नसते, असे म्हटले जाते. हिच गोष्ट 83 व्या वर्षी मास्टर्स डिग्री घेणाऱ्या सोहन सिंह गिल यांनी सिध्द केली आहे. लवली प्रोफेशन युनिवर्सिटीमध्ये आयोजित दीक्षांत समारोहामध्ये त्यांना मास्टर डिग्रीने सन्मानित करण्यात आले. मागील 61 वर्षांपासून त्यांना मास्टर डिग्री पुर्ण करायची होती.

सोहन सिंह गिल यांचा 15 ऑगस्ट 1936 रोजी होशियारा जिल्ह्यातील दात्ता कोट फतूही गावात जन्म झाला होता. त्यांनी प्रायमरी शाळा पंडोरी गंगा सिंहमधून तिसरीपर्यंतचे, खैरड अच्छरवाल येथून 6 वी पर्यंत उर्दुचे शिक्षण घेतले. त्यानंतर 1953 मध्ये त्यांनी खालसा हायस्कूल माहलपूर येथून दहावीचे शिक्षण पुर्ण केले. 1957 ला चार वर्षांची बीएची पदवी देखील त्यांनी मिळवली. 1957-58 मध्ये त्यांनी बॅचलेर टिचिंगचे शिक्षण देखील घेतले. त्यावेळी बीएड नव्हते.

लेक्चरर असलेल्या सोहन सिंह गिल यांनी 83 व्या वर्षी एमए इंग्लिश डिग्री मिळवत उदाहरण समोर ठेवले आहे. 33 वर्ष त्यांनी केनियामध्ये शिक्षण क्षेत्रात कार्य देखील केले आहे. याचबरोबर केनिया हॉकी अंपायर्स असोसिएशनमध्ये त्यांनी 6 वर्ष काम केले आहे. असोसिएशनच्या सचिवपदी देखील ते होते.

2017 साली निवृत्ती घेतल्यानंतर त्यांना शिक्षण पुर्ण करण्याचा करण्याचा निर्णय घेतला. शिक्षण पुर्ण करण्यासाठी त्यांच्या पत्नी जोगिंदर कौर यांनी देखील त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांचा मुलगा इंजिनिअर म्हणून अमेरिकेत कार्यरत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मास्टर डिग्री मिळवण्याची अपुर्ण असलेली इच्छा पुर्ण केल्याने सोहन सिंह गिल खूपच आनंदी आहेत.

Leave a Comment