टीम इंडियाच्या खेळाडूंचा दैनंदिन भत्ता डबल, आता मिळणार इतके पैसे

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ परदेशात शानदार कामगिरी करत आहे. यामुळे बीसीसीआयची प्रशासकीय समिती (सीओए) ने संघाच्या खेळाडूंच्या दैनंदिन भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयचे संचालन करणाऱ्या सीओएने परदेश दौऱ्यांसाठी मिळणाऱ्या दैनंदिन भत्ता दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन भत्त्यानुसार, आता परदेश दौऱ्यांवर जाणाऱ्या खेळाडूंना दररोज 250 डॉलर (17,800 रूपये) मिळतील. आधी ही रक्कम 125 डॉलर (8,900 रूपये) होती.

हा भत्ता बिझनेस क्लास प्रवास, राहण्याचा खर्च आणि लाँड्री या खर्चाच्या व्यतरिक्त दिला जाणार आहे.

भारतीय संघाचे यावर्षी बहुतांश सामने हे घरच्या मैदानावरच खेळले जाणार आहेत. भारतीय क्रिकेट संघ पुढील वर्षीच्या सुरूवातीला न्युझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.

 

Leave a Comment