प्रधानमंत्री देशाबाहेर असताना त्यांचा आदर ठेवला पाहिजे – शशी थरूर

भाजपवर सातत्याने टीका करणारे काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्यासाठी परदेशात जाणाऱ्या पंतप्रधानांचा सन्मान केला पाहिजे, असे वक्तव्य केले आहे.

शशी थरूर म्हणाले की, जेव्हा पंतप्रधान भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी परदेश दौरे करतात त्यावेळा त्यांना सन्मान मिळाला पाहिजे. पण जेव्हा ते देशात असतात, तेव्हा त्यांना प्रश्न विचारले गेले पाहिजे. पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

तसेच, हिंदी भाषेवरून चाललेल्या वादावर ते म्हणाले की, मी त्रि-भाषीय फॉर्म्युलाच्या बाजूने आहे. देशात हिंदी, हिंदुत्व आणि हिंदुस्तान ही भाजपची विचारधारा देशासाठी धोकादायक आहे.

मॉब लिचिंगच्या घटनांवर भाजपवर टीका करताना थरूर म्हणाले की, हे हिंदुत्व आणि प्रभू श्री राम यांचा अपमान आहे. ते म्हणाले की, छत्रपती महाराजांच्या शासनामध्ये देखील विविध समुदायाचे लोक होते. त्यांनी एकदुसऱ्यांचा सन्मान करण्यास सांगितले होते.

Leave a Comment