ही लहान मुलगी खेळते अजगरा सोबत, व्हिडीओ व्हायरल

लहान मुलांना पाळीव प्राण्याबरोबर खेळतानाचे व्हिडीओ बघून आपण नेहमीच क्यूट, सुंदर अशा प्रतिक्रिया देत असतो. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका छोट्या मुलीचा व्हिडीओ पाहून भिती आणि कुतूहल अशा भावना मनात येतात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये लहान मुलगी पाळलेल्या अजगराबरोबर खेळत आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, साप त्या लहान मुलीच्या चेहऱ्याभोवती येते आणि तिच्या माथ्यावर किस करतो. त्यानंतर साप रांगत तिच्या शरीरावरून जातो. ती लहान मुलगी त्या अजगराला कुशीत पकडते देखील. संपुर्ण व्हिडीओमध्ये ती लहान मुलगी अजगराबरोबर खेळताना हसत आहे.

12 सप्टेंबरला शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत 11 मिलियन पेक्षा अधिक व्यूज आले आहेत. तर 29 हजार लाईक्स आणि 8 हजार जणांनी रिट्विट्स देखील केले आहे.

व्हिडीओ बघून घाबरलेल्या आणि चकित झालेल्या युजर्सनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, साप हा साप असतो. मी तुला भेटायला आलो आणि तुझ्या घरात साप आढळला तर मी नक्कीच त्याला मारेल.’ तर काहींनी ‘अजगराने त्या लहान मुलीला किस केले आहे,’ असे म्हटले.

Leave a Comment