टिकटॉकमुळे या महिला बनल्या सेलिब्रेटी, कमवतात लाखो रूपये

आज सोशल मीडियाचा सर्वत्र बोलबाला आहे. जर तुमच्यामध्ये कौशल्य असेल तर तुम्ही सोशल मीडियाद्वारे एक चांगले करिअर बनवू शकता. सध्या टिकटॉकमुळे देखील अनेक महिला सेलिब्रिटी झालेल्या आहेत. शॉर्ट व्हिडीओ बनवून सेलिब्रेटी झालेल्या या महिलांविषयी जाणून घेऊया.

केवळ एका स्मार्टफोनद्वारे 15 सेंकदांचा टिकटॉक व्हिडीओ बनवून या महिला सोशल मीडियावर हिट झाल्या आहेत. टिकटॉकचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. या युजर्सचे लाखो फॉलोवर्स देखील असतात. याद्वारे ते लाखो रूपये देखील कमवतात.

(Source)

या टिकटॉक युजर्सचे नाव नगमा मिर्जाकर आहे. ती डान्स आणि कॉमेडी व्हिडीओ बनवते. सध्या तिचे टिकटॉकवर 10.2 मिलियन फॅन्स आहेत. कॉमर्समध्ये मास्टर्स डिग्री करणाऱ्या नगमाने बिझनेस एडमिनिस्ट्रेशन (मार्केटिंग) मध्ये देखील मास्टर्स केले आहे. नगमाला फॅशन आणि ब्युटीवर ब्लॉग लिहायला देखील आवडते.

(Source)

गरिमा चौरसियाचे टिकटॉकवर 15.7 मिलियन फॅन्स आहेत. मॉडेल असलेली गरिमा डान्स, कॉमेडी आणि लिप-सिंकिंग व्हिडीओ बनवते. तिचा प्रत्येक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो.

(Source)

टिकटॉक युजर्सला मोनी कुंडू ही देखील मोठ्या प्रमाणात आवडते. तिचे टिकटॉकवर 2.8 मिलियन फॅन्स आहेत. तिचे व्हिडीओ तणाव दूर करणारे आणि फनी असतात. तिच्या अनेक व्हिडीओमध्ये तिचा पती आणि मुलगा देखील असतो. युजर्सला तिचे फॅमिली व्हिडीओ खूप आवडतात.

(Source)

वाणी चौधरीचे टिकटॉकवर 223.3K फॅन्स आहेत.  ती स्कीनकेअरवर व्हिडीओ बनवत असते. तिचे हे व्हिडीओ युजर्सला खूप आवडतात.

केवळ या चारच नाही तर अनेक मुली व महिलांनी देखील टिकटॉकच्या माध्यमातून नाव कमावले आहे.

Leave a Comment