‘गल्ली बॉय’ जाणार ऑस्करला

अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका असलेला’ गल्ली बॉय’ चित्रपटाला 92 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून नामांकन मिळाले आहे. इंडियन फिल्म फेडरेशनने शनिवारी याबाबत घोषणा केली. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या अॅकेडमी अवॉर्डसाठी ‘गल्ली बॉय’ला बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म कॅटेगरीमध्ये नांमाकित करण्यात आले आहे.

हा चित्रपट यंदाच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात रणवीर सिंग एका रॅपरच्या भूमिकेत होता तर आलिया भट्टने त्याच्या प्रेयसीची भूमिका पार पाडली होती. या दोघांबरोबरच विजय राज, कल्कि कोचिन, सिद्धार्थ चतुर्वेदी, विजय वर्मा आणि अमृता सुभाष यांची देखील प्रमुख भूमिका आहे.

भारताकडून ऑस्करसाठी नामांकन करण्यासाठी 27 चित्रपटांमध्ये स्पर्धा सुरू होती. मात्र अखेर गल्ली बॉयने सर्वांवर मात केली.

गल्ली बॉयने बॉक्स ऑफिसवर देखील बक्कळ कमाई केली होती. चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तरने केले आहे. तर निर्मिती रितेश सिधवाणी आणि फरहान अख्तर यांनी केली आहे. या चित्रपटाला 2019 च्या मेलबर्न येथील भारतीय फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. याचबरोबर दक्षिण कोरियामध्ये झालेल्या 23 व्या बुकियॉन इंटरनेशनल फँटास्टिक फिल्म फेस्टिवलमध्ये देखील पुरस्कार पटकवला होता.

 

Leave a Comment