गुगलने दिला एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला जन्को ताबेई यांना ट्रिब्यूट

सर्च इंजिन गुगलने आपल्या डुडलच्या माध्यमातून माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या महिला जन्को ताबेई यांना सन्मानित केले आहे. आज त्यांचा 80 वा स्मृतीदिन आहे. गुगलने सात पर्वतांवर उडी मारणारी एक एनिमेटेड आकृती बनवली आहेत. जन्को ताबेई या जापानच्या होत्या. त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1939 ला झाला होता.

16 मे 1975 ला त्यांनी माउंट एव्हरेस्ट शिखर सर करत विक्रम केला होता. त्यावेळी त्यांचे वय केवळ 35 वर्ष होती. शिखर पार केल्यानंतर जापानचे सम्राट, क्राउन प्रिंस आणि राजकुमारीकडून देखील त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 1996 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या होत्या की, सर्वात कमी वयात शिखर सर करणाऱ्या त्या 36 व्या आहेत. हा विचार करून खूप आनंद होतो. त्यांनी शोवा महिला विश्वविद्यालयामधून इंग्लिश लिटरेचरचे शिक्षण घेतले होते.

त्या युनिवर्सिटी माउटेंन क्लाइंबिगच्या सदस्या होत्या. 1969 मध्ये ग्रेज्युएशन पुर्ण झाल्यानंतर त्यांनी लेडीज क्लाइंबिंग क्लब –जापानची स्थापना केली. 2012 मध्ये त्यांना कॅन्सर झाला होता. 20 ऑक्टोंबर 2016 ला त्यांचे निधन झाले.

Leave a Comment