हे 2 अ‍ॅप्स तुमच्या फोनमधून त्वरित डिलीट करा

गुगलने आपल्या प्ले स्टोरमधून दोन लोकप्रिय अ‍ॅप हटवले आहेत. गुगलने म्हटले आहे की, या अ‍ॅप्समध्ये मॅलिसियस कोड सापडला असून, जे एडवेअरप्रमाणे कार्य करते. गुगलने युजर्सला आपल्या फोनमधून देखील हे अ‍ॅप्स डिलीट करण्यास सांगितले आहे.

Sun Pro Beauty Camera आणि Funny Sweet Selfie Camera हे दोन्ही अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. आतापर्यंत 15 लाखांपेक्षा अधिकवेळा हे अ‍ॅप्स डाउनलोड करण्यात आलेले आहे. गुगलचे म्हणणे आहे की, हे दोन्ही अ‍ॅप्स पॉप-अप जाहिरातींद्वारे पैसे कमवत होते.

तसेच, बॅकग्राउंडमध्ये देखील हे अ‍ॅप्स सुरूच असायचे, त्यामुळे युजर्सला देखील अडचणींचा सामना करावा लागत असे. त्यामुळे फोनची बॅटरी देखील डाउन होत असे.

गुगलने मॅलिसियस कोडमुळे याआधीही अनेक अ‍ॅप्स हटवले आहेत. काही दिवसांपुर्वीच गुगलने सर्वात लोकप्रिय अ‍ॅप कॅम स्कॅनरला देखील प्ले स्टोरमधून हटवले होते. मात्र कॅम स्कॅनरने लगेचच अ‍ॅपमध्ये बदल करत प्ले स्टोरवर रिपब्लिश केले.

गुगलने डेव्हल्पर्ससाठी कठोर नियम बनवले असून, नियमांनुसार अँड्राइड अ‍ॅप्सला अप्रूवल मिळण्यासाठी तीन दिवस लागत. आधी डेव्हल्पर्स थेट अ‍ॅप पब्लिश करू शकत होते.

 

Leave a Comment