या ऑफरमुळे केवळ 39,300 रूपयांना खरेदी करू शकता आयफोन 11


अ‍ॅपलने मागील आठवड्यामध्ये आयफोन 11 सीरिज लाँच केली होती. शुक्रवारपासून आयफोन 11, आयफोन 11 प्रो आणि 11 प्रो मॅक्सची प्री-बुकिंग सुरू झाली असून, ग्राहक हा फोन अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून ही खरेदी करू शकतात. याचबरोबर कंपनीने यावर काही खास ऑफर देखील दिल्या आहेत. खास ऑफर अंतर्गत आयफोन 11 केवळ 39,300 रूपयांमध्ये खरेदी करू शकता.

फ्लिपकार्टवरील ऑफर –
फ्लिपकार्टवर एचडीएफसी बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्डवापरून आयफोन 11 खरेदी केल्यास 6,000 रूपयांची सूट मिळेल. याचबरोबर ग्राहकांना 14,650 रूपयांची एक्सचेंज ऑफर देखील देण्यात आली आहे. आयफोन 11 ला तुम्ही 7,375 रूपयांच्या नो कॉस्ट ईएमआयवरही तुम्ही खरेदी करू शकता. तर आयफोन प्रो मॅक्सवर 7 हजा रूपये डिस्काउंट आहे तर अ‍ॅपल वॉच सीरिज 5 वर 4 हजार रूपये सूट मिळत आहे.

(Source)

आयफोन 11 प्रो वरील ऑफर्स – आयफोन 11 प्रो ची किंमत 99 हजार रूपये आहे. या फोनवर 6 हजार रूपये डिस्काउंट आणि 14, 650 रूपये एक्सचेंज ऑफर मिळत आहे. जर वनप्लस 6 टी ला एक्सचेंज ऑफर अंतर्गत बदलले तर आयफोन 83,200 रूपयांमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. तर गुगल पिक्सल 2 एक्सएल एक्सचेंजवर आयफोन 11 प्रो 86 हजारांना मिळेल. हा फोन तुम्ही 13,208 नो कॉस्ट इएमआयवर खरेदी करू शकता.

आयफोन 11 प्रो मॅक्सवरील ऑफर्स – या फोनची किंमत 1,09,900 रूपये आहे. एचडीएफचे कार्ड वापरून खरेदी केल्यास या फोनवर 7 हजार रूपये सूट मिळेल. सॅमसंग गॅलेक्सी एस 9 च्या एक्सचेंजमध्ये हा फोन तुम्हाला 89,250 रूपयांमध्ये मिळेल. तुम्ही 14,875 रूपयांच्या ईएमआयमध्ये हा फोन खरेदी करू शकता.

(Source)

एचडीएफसी बँकेच्या कार्डधारकांसाठी ऑफर्स – एचडीएफसी बँक आपल्या Infinia क्रेडिट कार्डधारकांना आयफोनच्या खरेदीवर मोठी सूट देत आहे. या ऑफर्स अंतर्गत ग्राहकांना 10एक्स रिवॉर्ड प्वाइंट देखील मिळेल. जर ग्राहक या प्लॅटफॉर्मचा वापर करून आयफोन खरेदी करतात, तर त्यांना रिवॉर्ड्स प्वाइंट्सच्या रूपात 19, 600 रूपये मिळतील. याचबरोबर 6 हजार रूपये डिस्काउंट देखील मिळेल. त्यानंतर आयफोन 11 तुम्हाला केवळ 39,300 रूपयांना मिळेल.

याचप्रमाणे या प्लॅटफॉर्मचा वापर केल्यास आयफोन 11 प्रो 65,770 रूपये, आयफोन 11 प्रो मॅक्स 74,470 रूपये आणि अ‍ॅपल वॉच सीरिज 24,600 रूपयांना मिळेल. अधिक माहितीसाठी तुम्ही बँकेच्या स्मार्ट बाय वेबसाइटला भेट देऊ शकता.

Leave a Comment