दिल्लीतील टॅक्सी चालक का ठेवतात फर्स्ट एड बॉक्समध्ये कंडोम ?


नवी दिल्ली : आपल्या गाडीतील फर्स्ट एड बॉक्समध्ये राजधानी दिल्लीतील अंधश्रद्धाळू टॅक्सी चालक कंडोम ठेवतात. पण बऱ्याच जणांना याचे कारण माहित नाही. पण कंडोम जर गाडीत नसेल, तर तेथील पोलीस दंड आकारतात. याचा अर्थ असा की सर्व कागदपत्र तुमच्याकडे असो, सीटबेल्ट लावलेला असो या सर्व गोष्टींबरोबरच तुमच्याकडे जर कंडोम नसेल, तर पोलीस तुमच्यावर दंड आकारु शकतात, असा त्यांचा समज आहे.

कमीत कमी तीन कंडोम दिल्लीतील अंधश्रद्धाळूंच्या टॅक्सींमध्ये ठेवणे अनिवार्य आहे. कंडोमचा वापर प्रवाशाला कुठे जखम झाल्यास केला जातो. तसेच कंडोम रक्तस्त्राव होत असलेल्या ठिकाणी वापरु शकता. फर्स्ट एड बॉक्समध्ये यासाठी पॅरासिटामॉल, बॅण्डएड, डेटॉल याशिवाय कंडोम ठेवणे गरजेचे असल्याचे दिल्लीतील सर्वोदय चालक संघटनेचे अध्यक्ष कमलजीत गील यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. दरम्यान, या मागचे कारणही ड्रायव्हर यांना माहित नाही.

प्रत्येक टॅक्सी चालकाने दिल्ली वाहन नियम कायदा (1993) नुसार आपल्या गाडीत फर्स्ट एड बॉक्स ठेवणे बंधनकारक आहे. ज्यामध्ये बॅण्डएड, कापूस, आयोडीन, निर्जंतूकीकरण करणारे डेटॉलसारखे औषध आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी असाव्यात. कंडोमचा वाहतुकीच्या या नियमात कुठेही उल्लेख केलेला नाही. तसेच केंद्र सरकारच्याही वाहतूक नियमात असा उल्लेख कुठेच आढळून येत नाही.

दरम्यान, दररोज दिल्लीत केंद्र सरकाने लागू केलेल्या नव्या वाहतूक नियमांमुळे वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होत आहे. तसेच वाहतूक नियमातील दंड दुपटीने वाढल्यामुळे नागरिकांना मोठ दंड भरावा लागत आहे. या नव्या कायद्यात गाडीत कुठेही कंडोम ठेवण्याची तरतूद नाही.

Leave a Comment