पक्ष्यांना राहण्यासाठी बांधला पाच मजली टॉवर, एकाच वेळी राहू शकतील 60 पक्षी


पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आणि सुरक्षिततेसाठी गाझियाबाद डेव्हल्पमेंट ऑथोरिटीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गाझियाबाद डेव्हल्पमेंट ऑथोरिटी व्हाइस चेअरपर्सनच्या घराच्या आवारात पाच मजली बर्ड्स हाउसिंग प्रोजेक्ट तयार करण्यात आला आहे. 2 लाख रूपये किंमतीच्या  बर्ड्स टॉवरमध्ये 60 घरटी आहेत. म्हणजेच प्रत्येक मजल्यावर 12 पक्षी राहू शकतील. ऊन आणि गर्मीपासून वाचण्यासाठी यावर मोठी छत्री लावण्यात आलेली आहे. याचबरोबर ही घरीट बनवण्यासाठी लाकडांचा वापर करण्यात आलेला आहे. यामध्ये चिमणी, कावळे, बुलबुल असे छोटे पक्षी राहू शकतील.

हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यावर इतर हाउसिंग कॉलनीमध्ये देखील बर्ड्स टॉवर सुरू करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हा प्रोजेक्ट बघून खाजगी बांधकाम करणारे बिल्डर देखील आपल्या हाउसिंग प्रोजेक्टमध्ये अशा प्रकारचा प्रयोग करण्याची शक्यता आहे.

जीडीएच्या वॉइस चेअरपर्सन कंचन वर्मा यांनी सांगितले की, एखाद्या गार्डन आणि पाण्याच्या स्त्रोताजवळ तयार करण्यात आलेले हे पहिले बर्ड्स हाउसिंग कन्स्ट्रक्शन आहे. पक्ष्यांना खाण्यासाठी दाणे देण्यास एका व्यक्तीची नेमणूक करण्यात आलेली आहे. पक्ष्यांना मांजर आणि कुत्र्यांपासून त्रास होऊ नये यासाठी टॉवर 10 फुट उंच लोखंडाच्या खांबावर तयार करण्यात आलेला आहे. हा टॉवर 7 फुट उंच आहे.

Leave a Comment