परदेशात जाऊन राहणाऱ्यांमध्ये भारतीय सर्वात पुढे


नोकरी, उद्योग, शिक्षण या सारख्या कारणांमुळे देश सोडून परदेशात जाऊन राहणाऱ्या भारतीयांची संख्या जगात सर्वाधिक आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या रिपोर्टनुसार, भारतात जन्म झालेले 1.75 करोड लोक जगभरातील विविध देशांमध्ये राहतात. या यादीत भारत पहिल्या स्थानावर आहे.

संयुक्त राष्ट्राच्या ‘द इंटरनेशनल माइग्रेंट स्टॉक 2019’ या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, जगभरातील प्रवाशांची संख्या जवळपास 27.2 कोटींवर पोहचली आहे. या रिपोर्टमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे वय, लिंग आणि मूळ देशाच्या आधारावर संख्या सांगण्यात आली आहे. एकूण प्रवाशांचे प्रमाण हे जगभरातील लोकसंख्येनुसार, 3.5 टक्के आहे. वर्ष 2000 मध्ये हे प्रमाण 2.8 टक्के होते. संयुक्त राष्ट्रानुसार, जगभरातील अर्धे प्रवासी हे केवळ 10 देशांमध्ये राहतात.

भारताने 2019 मध्ये 51 लाख आंतरराष्ट्रीय प्रवाशांना देशात जागा दिली. 2015 मध्ये हा आकडा 52 लाख होता. युरोप आणि उत्तर अमेरिकामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांना राहण्यास जागा देण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. रिपोर्टनुसार, 2019 मध्ये युरोपात 8.2 कोटी आणि उत्तर अमेरिकेत 5.9 कोटी प्रवासी राहत आहेत.

या टॉप – 10 देशांचे प्रवासी जगभरातील विविध देशांमध्ये राहतात –

देश    –  प्रवासी संख्या

  1. भारत – 1.75 कोटी
  2. मॅक्सिको- 1.18 कोटी
  3. चीन – 1.07 कोटी
  4. रशिया – 1.05 कोटी
  5. सीरिया – 82 लाख
  6. बांग्लादेश – 78 लाख
  7. पाकिस्तान -63 लाख
  8. यूक्रेन – 59 लाख
  9. फिलिपीन्स – 54 लाख
  10. अफगाणिस्तान – 51 लाख

 

 

Leave a Comment