फेक न्यूज पसरवणारे हजारो अकाउंट्सवर ट्विटरची संक्रांत


ट्विटर सध्या क्लीन अभियान चालवत असून, भारतीय सैन्याच्या नावाने असलेले हजारो फेक अकाउंट ब्लॉक केल्यानंतर आता ट्विटरने फेक न्यूज पसरवणारे अकाउंट ब्लॉक करण्यास सुरूवात केली आहे. सोशल मीडियावर फेक न्यूजचा मोठा प्रसार होत असल्याने ट्विटरने हे पाऊल उचलले आहे.

ट्विटरने संयुक्त अरब अमिरात, चीन आणि स्पेन सरकारच्या विरूध्द फेक न्यूज पसरवणारे अकाउंट्स बंद केले आहेत. बंद करण्यात आलेल्या अकाउंट्समध्ये काही अकाउंट्स चीनमधील होते. हे अकाउंट्स हाँगकाँगमध्ये सुरू असलेल्या विरोध-प्रदर्शनला उकसवण्याचे काम करत होते.

याचबरोबर सउदी अरबच्या समर्थनात कतार आणि यमनच्या लोकांना इजिप्त आणि संयुक्त अरब अमिरातमधून संदेश पाठवले जात होते. स्पेन आणि इक्वाडोरमध्ये फेक न्यूज पसरवणारे अकाउंट्स देखील ट्विटरने निलंबित केले आहेत. याआधी ट्विटरने इराणच्या सरकारी मीडिया संघटनांचे अकाउंट्स देखील ब्लॉक केले होते.

Leave a Comment