टिंडर युजर्ससाठी लाँच करणार ‘स्वाइप नाइट’ रियालिटी शो


डेटिंग अ‍ॅप ‘टिंडर’ने आपल्या युजर्ससाठी एक खास फिचर्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. टिंडर अमेरिकेत 6 ऑक्टोंबर पासून स्वाइप नाइट हे फिचर लाँच करणार आहे.

‘स्वाइप नाइट’ फिचर हा एक शो असणार आहे. यामध्ये एपोकॅलिक एडव्हेंचर (जग समाप्त होणार आहे) मध्ये युजर्सची प्रमुख भूमिका असेल व त्यात योग्य निर्णय घ्यावा लागेल.  युजर्स ज्याप्रमाणे निर्णय घेतली, भूमिका घेतली त्याप्रमाणे शोमध्ये बदल घडत जातील. हे एखाद्या रियालिटी शो प्रमाणे असेल.

या शोमध्ये एन्जेला वाँन्ग कॉर्बोन, जॉर्डन ख्रिश्चन हेअर्न आणि शी गॅबर हे प्रमुख भूमिकेत असतील व  युजर्सला त्यांना योग्य निवड करण्यास, निर्णय घेण्यासाठी गाईड करावे लागेल. युजर्सच्या सुचनांप्रमाणे स्टोरीमध्ये बदल होतील.

दर रविवारी स्वाइप नाइटचा प्रत्येक नवीन एपिसोड टिंडर अ‍ॅपवर येईल. युजर्सनी घेतलेले निर्णय, केलेली निवड त्यांना योग्य मॅच मिळवण्यास मदत करेल.

Leave a Comment