या ठिकाणी पोलिसांनी जाळला तब्बल 63 हजार किलो गांजा


आंध्रप्रदेश येथील विशाखापट्टनम येथे पोलिसांनी वेगवेगळ्या तस्करींमध्ये जप्त केलेला तब्बल 63,878 किलो गांजा जाळला आहे. मागील 10 वर्षातील 455 तस्करींमध्ये हा गांजा जप्त करण्यात आला होता. या गांजाची किंमत 15 करोड रूपये असल्याचे सांगण्यात येते.

हा गांजा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून पोत्यात भरून ट्रक आणि व्हॅनमधून आणण्यात आला. गांजा पेटवून देण्यापुर्वी पोलिसांनी या संपुर्ण गांज्याचे वजन केले.

(Source)

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील वर्षी 43,341 किलो गांजा नष्ट करण्यात आला होता. अनेक गांजा स्मगलर्स हे शेतकऱ्यांना गांजा लावण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. शेतकऱ्यांनी दुसऱ्या पिकांची शेती करावी यासाठी सरकारकडून जागृकता मोहिम देखील चालवली जात आहे.

दोन वर्षात चौथ्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा नष्ट करण्यात आला आहे. तसेच गांजा तस्करीमध्ये जप्त करण्यात आलेल्या 196 गाड्यांचा देखील पोलिसांनी लिलाव केला आहे.

 

Leave a Comment