प्रवाशांशिवाय 46 विमानांनी उड्डाण घेतल्याने पाकला बसला करोडोंचा फटका


पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सने 46 फ्लाइट या रिकाम्याच परत पाठवल्या आहेत. यामुळे एअरलाइन्सला करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे. ऑडिट रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली असून, खास गोष्ट म्हणजे इस्लामी देशातून 36 फ्लाइट रिकाम्या गेल्या आहेत, ज्यामध्ये हजला जाणाऱ्या प्रवाशांना जायचे होते. थोडक्यात, पाकिस्तान एअरलाइन्सला मक्का-मदीनाला जाणारे हज प्रवासीच मिळाले नाहीत.

पाकिस्तानी मीडियाने हा रिपोर्ट प्रकाशित केला असून, हे प्रकरण 2016-17 चे आहे. 46 फ्लाइट अशा होत्या ज्यामध्ये क्रू मेंबर्ससोडून एकही प्रवासी नव्हता. त्यामुळे 14 करोड रूपयांचे नुकसान झाले आहे.

काही रिपोर्टनुसार, खाली फ्लाइटबद्दल सरकारला माहिती देण्यात आली होती. मात्र यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आता ऑडिट रिपोर्टनंतर सरकार यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले जात आहे.

पीआयएची आर्थिक परिस्थिती देशाप्रमाणेच खराब आहे. ऑगस्टमध्येच एअरलाइन्सने 1 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे.

Leave a Comment