कपिल देव यांनी मिळवले या स्पर्धेचे जेतेपद


नवी दिल्ली – भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी क्रिकेटमदध्ये कमाल केल्यानंतर आपले कर्तृत्व सिद्ध गोल्फमध्येही केले आहे. एवीटी चॅम्पियन्स टूर गोल्फ टूर्नामेंटचे जेतेपद भारताला पहिला विश्वचषक मिळवून दिलेल्या कपिल देव यांनी आपल्या नावावर केले आहे.

त्यांनी ही किमया ६० ते ६४ वर्षाच्या वयोगटात साधली आहे. १०० पेक्षा जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. दोन्ही दिवस पाऊस पडल्यामुळे हा खेळ खेळणे कठीण झाले होते. कपिल देव जेतेपद पटकावल्यावर म्हणाले, जिंकणे नेहमीच चांगले असते. आमच्यासारख्या वरिष्ठ खेळाडूंसाठी खेळण्याची संधी मिळणे भाग्याचे असल्यामुळे आता आमच्यातही प्रतिस्पर्धी असल्याची भावना जागृत होत आहे.

या स्पर्धेचा पहिला टप्पा दिल्लीतील एनसीआरमध्ये तर, दुसरा टप्पा बंगळुरूमध्ये मार्चमध्ये आयोजित करण्यात आला होता. जानेवारीत कोलकाता येथे अंतिम टप्पा खेळवण्यात येणार आहे. कपिल देव यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत २२५ एकदिवसीय आणि १३१ कसोटी सामने खेळले आहेत.

नुकतीच हरियाणा स्पोर्ट्स विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कपिल देव यांची निवड करण्यात आली आहे. हरियाणाचे युवा व क्रीडा मंत्री अनिल वीज यांनी याची माहिती ट्विट करून दिली. हरियाणा स्पोर्ट्स विद्यापीठ हे देशातील तिसरे क्रीडा विद्यापीठ आहे.

Leave a Comment