विराट कोहलीपेक्षा जास्त जोफ्रा आर्चरला पगार


लंडन : क्रिकेट या खेळाचे भारत आणि इंग्लंड या दोन देशांमध्ये सर्वात जास्त चाहते आहेत. क्रिकेट खेळाडूंची भारतात तर पूजा केली जाते. विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी ही नाव यात आघाडीवर असतात. पण इंग्लंडचे खेळाडू पगाराच्या तुलनेत भारतीय खेळाडूंच्या पुढे गेले आहेत. विश्वचषक स्पर्धेत आणि अशेस मालिकेत दमदार कामगिरी करणारा इंग्लंडचा जलद गोलंदाज जोफ्रा आर्चरचे प्रदर्शन पाहते त्याला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मोठे गिफ्ट दिले आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जोफ्रा आर्चरला कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये केंद्रीय अनुबंध गटात सामिल केले आहे. 24 वर्षीय आर्चरने विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वात जास्त तर ऑस्ट्रेलिया विरोधात झालेल्या अशेस मालिकेत 20.27च्या सरासरीनं 22 विकेट घेतल्या आहेत. 2018पासून इंग्लडकडून आर्चरने खेळण्यास सुरुवात केल्यानंतर 2019-20मध्ये चांगली कामगिरी केली.

2019-20मध्ये बीसीसीआयने काही खेळाडूंना अ प्लस आणि अ अशा दोन गटांमध्ये सामिल केले होते. यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या तीन खेळाडूंना अ प्लसमध्ये स्थान मिळाले. यांना प्रत्येकी 7 कोटी पगार देण्यात येत आहे. पण इंग्लंडच्या खेळाडूंना 1 मिलीयन म्हणजे 9 कोटी देण्यात येणार आहेत.

या लिस्टमध्ये कसोटी आणि टी-20 खेळणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंना सामिल करण्यात आले आहे. यात जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर, जो रूट, बेन स्टोक्स आणि क्रिस वोक्स यांना प्रत्येक वर्षी 9 कोटी रूपये मिळणार आहेत. तर, भारताचा कर्णधार विराट कोहलीला 7 कोटी मानधन दिले जाते.

एका वर्षासाठी कसोटी करार खेळणाऱ्या या खेळाडूंना 6 लाख पाऊंड म्हणजे 53 कोटी रूपये मिळतात. तर, एकदिवसीय करारमध्ये असलेल्या खेळाडूंना 2.75 लाख पाऊंड म्हणजे 25 कोटी रूपये मिळणार आहे.

Leave a Comment