फेसबुकने 10 हजारांपेक्षा अधिक अ‍ॅप्सवर घातली बंदी


सोशल मीडिया कंपनी फेसबुकने आपल्या प्लॅटफॉर्मवरील तब्बल 10 हजारांपेक्षा अधिक अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. कंपनीने केब्रिज एनालिटिका प्रकरणानंतर हे मोठे पाऊल उचलले आहे. 2018 मध्ये केंब्रिज एनालिटिकावर युजर्सच्या डाटा सेल केल्याचा आरोप लागला होता. या प्रकरणात फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गला अमेरिकेच्या संसदेला देखील सामोरे जावे लागले होते.

फेसबुकने सांगितले की, या प्लॅटफॉर्मवर या बरोबरच 400 डेव्हलपर्स जोडलेले आहेत. या अ‍ॅप्सने युजर्सच्या खाजगी माहितीला नुकसान पोहचवले होते. या वर्षीच्या सुरूवातीलाच कंपनीला युजर्सच्या प्रायव्हेसीबाबत 5 बिलियनचा दंड लागला होता. तसेच, केंब्रिज एनालिटिकावर आरोप होता की, त्याने फेसबुकच्या जवळपास 8.7 कोटी युजर्सचा डाटा चोरी केला आहे.

या प्रकरणावर मार्क झुकरबर्गला माफी देखील मागावी लागली होती. केंब्रिज एनालिटिकाने 2016 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक अभियानात काम केले होते. त्यामुळे डाटा चोरीबाबत कठोर नियमांतर्गत फेसबुकने 10 हजार अ‍ॅप्सवर निर्बंध घातले आहे.

 

Leave a Comment