रॉयल चॅलेंजर्स बंगुळुरू संघाच्या संघ व्यवस्थापनात बदल


नवी दिल्ली – विराटसेनेच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची कामगिरी IPL 2019 मध्ये सुमार दर्जाची होती. चांगले खेळाडू असूनही 14 सामन्यात त्यांना एकूण 11 गुणच मिळवता आल्यामुळे आतापासूनच IPL 2020 साठी बंगळुरूने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. IPL मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या संघ व्यवस्थापनात टीम इंडियाचे माजी सहाय्यक प्रशिक्षक आणि ट्रेनर शंकर बसू यांनी पुनरागमन केले आहे. त्यांना बंगळुरू संघाने तंदुरूस्ती मार्गदर्शक म्हणून ताफ्यात दाखल करून घेतले आहे.

टीम इंडियासाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहतानाच ते एका खासगी जिमच्या संचालक मंडळावरही कार्यरत होते. त्यामुळे लाभाचे पद भूषवल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पण त्यांना आता बंगळुरू संघाने प्रशिक्षक वृंदात सामील करून घेतले आहे. बसूंव्यतिरिक्त अ‍ॅडम गिफिथ यांनाही प्रशिक्षक वृंदात समाविष्ट करून घेण्यात आले आहे. गिफिथ यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून ताफ्यात सामील करून घेण्यात आले आहे. तर श्रीधरन श्रीराम यांना फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले आहे. याशिवाय, इव्हॅन स्पीचली याला फिझीयो, मलोलन रंगराजहंस आणि सौम्यदीप पैन यांचाही ताफ्यात समावेश करून घेण्यात आला आहे.

Leave a Comment