पुन्हा घायाळ करायला आली अमृता खानविलकर


नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अभिनेत्री अमृता खानविलकर चर्चेत असते. तिने नुकतेच केलेले हॉट फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


नुकताच खतरों के खिलाडीच्या 10 व्या सीझनमध्ये अमृताने भाग घेतला होता. ‘खतरों के खिलाडी’चं शूट बल्गेरियामध्ये झाल्यानंतर अमृता आता भारतात परतली आहे.


अमृताने नुकतेच झारा फॅशनसाठी फोटोशूट केले. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या फोटो शूटमधील काही फोटो शेअर केले आहेत.


सध्या सोशल मीडियावर अमृताचे हे फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत. ती हॉट आणि ग्लॅमरस अवतारात या फोटोमध्ये दिसत आहे.
मराठी सिनेसृष्टीसोबतच अमृता खानविलकरने हिंदी सिनेसृष्टीमध्येही आपला ठसा उमटवला आहे. याशिवाय ती उत्कृष्ट डान्सर सुद्धा आहे.

View this post on Instagram

📸 @ipshita.db @nehachaudhary_ #stylefileswithamu

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on


अमृताचे या अगोदर खतरों के खिलाडी मधील स्पोर्ट्स लुक सुद्धा व्हायरल झाले होते. ती त्यामध्ये परफेक्ट फॅशन गोल्स देताना दिसत आहे. या व्यतिरिक्त तिच्या मालदीव व्हेकेशनचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.


अमृताने ‘खतरों के खिलाडी’च्या अगोदर मोठ्या पडद्यावरून ब्रेक घेत छोट्या पडद्यावर कमबॅक केले होते. तिच्या जिवलगा या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळला होता.


लवकरच अमृता खानविलकर बॉलिवूडच्या ‘मलंग’ चित्रपटात दिसणार आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन याबद्दल माहिती दिली.

Leave a Comment