1.39 लाखांच्या हेडफोनसाठी विकल्या मावशीच्या किडन्या, अ‍ॅमेझॉनवर लिहिला रिव्ह्यू


अ‍ॅमेझॉनवर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स आणि गॅजेट्सची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असते. या प्रोडेक्ट्समध्ये हेडफोन्सचा देखील समावेश आहे. अ‍ॅमेझॉनवर 200 रूपयांपासून ते 1.40 लाखांपर्यंतचे हेडफोन्स उपलब्ध आहेत. सध्या अ‍ॅमेझॉनवरील एका खास हेडफोनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सेनहाइजर ब्रँडचा एक हेडफोन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कस्टमरच्या रिव्यूमुळे हेडफोन चर्चेचा विषय ठरत आहे. रिव्यूमध्ये एका कस्टमरने लिहिले की, त्याने त्याच्या मावशीच्या दोन्ही किडन्या विकून 1.39 लाखांचा हेडफोन खरेदी केला आहे.

एका कस्टमरने अ‍ॅमेझॉनच्या रिव्यू सेक्शनमध्ये लिहिले की, हा हेडफोन शानदार आहे. किंमतीमुळे हा हेडफोन खरेदी करणे मी टाळत होतो. मात्र नंतर मावशीने किडनी विकून हेडफोन खरेदी करण्याचा सल्ला दिला. एका किडनीने काम झाले नाही म्हणून मला दोन्ही किडन्या विकाव्या लागल्या. मला माझ्या निर्णयाचे काहीही वाईट वाटत नाही. हेडफोनची साउंड क्वालिटी जबरदस्त आहेत. गेम खेळताना, चित्रपट बघताना आणि गाणी ऐकताना प्रत्येक गोष्टीत हेडफोन जबरदस्त आहे. मात्र एक प्रॉब्लम आहे. आता मावशी राहिलेली नाही.

हा रिव्यू अ‍ॅमेझॉन साइटवर लिहिण्यात आलेला आहे. मात्र वाचून एक गोष्ट स्पष्ट होते की, हेडफोन्सच्या एवढ्या मोठ्या किंमतीवर व्यंग करताना मस्करीमध्ये हा रिव्यू लिहिण्यात आला आहे. मात्र हा रिव्यू सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, युजर्स यावर भन्नाट कमेंट्स करत आहेत.

सोशल मीडिया युजर्सनी रिव्यू लिहिणाऱ्या व्यक्तीच्या मावशीला श्रध्दांजली दिली तर काहींनी सर्वात फनी रिव्यू असल्याचे म्हटले.

Mausiji 😂😂

Posted by Stand Up Comedian Klub by DKB on Thursday, September 19, 2019

एका युजरने लिहिले की, मलाही हा हेडफोन खरेदी करायचा आहे; पण मी खरेदी करू शकत नाही. कारण मला मावशी नाही.

Leave a Comment