एअर इंडिया क्रू मेंबर्सला देणार ‘शाकाहारी जेवण’


पिपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स (पेटा) ने एअर इंडियाद्वारे आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी विमानाच्या क्रु मेंबर्सला कमी किंमतीचे आणि शाकाहारी जेवण देण्याच्या प्रस्तावाचे कौतूक केले आहे. पेटा इंडियाने एअर इंडियाच्या चेअरमन अश्वनी लोहानी यांना पत्र लिहून क्रु मेंबर्सबरोबरच सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शाकाहारी जेवण देण्यात यावे असा आग्रह केला आहे.

पत्रामध्ये म्हटले आहे की, चांगल्या आरोग्यासाठी शाकाहारी जेवण हे प्राण्यांसाठी आणि पर्यावरणासाठी देखील चांगले आहे.

पत्रामध्ये म्हटले आहे की, मांस, दूध, पनीर आणि अंडी महाग आहेत. तर बीन्स, तांदूळ, पास्ता, भाज्या आणि फळे हे त्या तुलनेत स्वस्त आहेत. मांस, अंडी आणि डेअरी उत्पादनांचे सेवन केल्याने मधुमेह, लठ्ठपणा, आजारपण होण्याची देखील शक्यता असते.

भारत मधुमेहाची राजधानी झाला असून, मांस खाल्यामुळे संसर्गजन्य आज होण्याची शक्यता असते. यामुळे 2012 ते 2030 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेला 6 हजार अब्ज डॉलरचा फटका देखील बसेल, असे पत्रात म्हटले आहे.

 

Leave a Comment