अमेरिकेला गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त मोदींतर्फे गिफ्ट


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेला रवाना झाले आहेत. येथील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात होत असलेल्या परिषदेत ते सामील होणार आहेत त्याचबरोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारतातर्फे एक गिफ्ट मोदी संयुक्त राष्ट्राला देत आहेत. या मुख्यालयात भारतातर्फे उभारण्यात आलेल्या गांधी सोलर पार्कचे उद्घाटन मोदी करणार आहेत. २४ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होत आहे. याबरोबरच मोदी गांधी पीस गार्डनचे उद्घाटनही करणार आहेत. महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त संयुक्त राष्ट्र संघ विशेष टपाल तिकीट जारी करत आहे.

संयुक्त राष्ट्संघातले भारताचे प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दिन गुरुवारी या संदर्भात माहिती देताना म्हणाले, संयुक्त राष्ट्र परिषदेत नेहमीच अक्षय उर्जा आणि जलवायू परिवर्तन प्रश्नाबाबत चर्चा केली जाते. त्यात भारताचा हा छोटा प्रयत्न आहे. आम्ही या प्रश्नासंदर्भात पुढे जाण्यास तयार आहोत हा संदेश यातून देण्याचा हा प्रयत्न आहे. गांधी सोलर पार्कसाठी १० लाख डॉलर्स खर्च आला असून मुख्यालयाच्या छतावर सोलर पॅनल्स बसविण्यात आली आहेत. संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्य असलेल्या १९३ देशाचे प्रतिक म्हणून १९३ सोलर पॅनल बसविली गेली आहेत. त्यातून ५० किलोवॅट वीज निर्मिती अपेक्षित आहे.

गांधी पीस गार्डन न्युयॉर्कचा भारतीय वाणिज्य दूतावास, एनजीओ शांती फंड आणि स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्युयॉर्क यांनी संयुक्तरित्या बनविले असून हे गार्डन ६०० एकर परिसरात उभारले गेले आहे.

Leave a Comment