व्हिवोने लाँच केला दोन पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यांसह जगातील पहिला फोन


भारतात आपला नवा स्मार्टफोन व्हिवो व्ही 17 प्रो स्मार्टफोन निर्माती कंपनी व्हिवोने लाँच केला आहे. 32 मेगापिक्सल क्षमतेचा ड्युअल पॉप-अप सेल्फी कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये आहे. कंपनीने दोन पॉप-अप सेल्फी कॅमेरे असलेला हा जगातील पहिलाच स्मार्टफोन असल्याचा दावा केला आहे. यातील एक कॅमेरा 32 मेगापिक्सल क्षमतेचा, तर दुसरा 8 मेगापिक्सल क्षमतेचा आहे. आजपासून या स्मार्टफोनसाठी प्री-बुकिंग सुरू झाले आहे. तर, याच्या विक्रीला 27 सप्टेंबरपासून सुरूवात होईल.

व्हिवो व्ही17 प्रो ची 29,990 रुपये एवढी किंमत निश्चित करण्यात आली आहे. ही किंमत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी आहे. व्हिवो व्ही17 प्रो मध्ये मागील बाजूला असलेल्या चार कॅमेऱ्यांपैकी मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सल क्षमतेचा आहे. यामध्ये AI सुपर नाइट मोड हे फीचर देखील आहे. याशिवाय मागील बाजूचे अन्य कॅमेरे अनुक्रमे 13, 8 आणि 2 मेगापिक्सल क्षमतेचे आहेत.

व्हिवो व्ही17 प्रो 8 ऑक्टोबर 2019 पर्यंत खरेदी केल्यास वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंटची ऑफर आहे. तर, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 10 टक्के कॅशबॅक मिळेल. व्हिवो व्ही17 प्रो स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 675 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. तसेच ‘कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 6’ चा वापर यामध्ये करण्यात आला आहे. 4,100 mAh क्षमतेची बॅटरी असलेल्या या फोनमध्ये 6.44 इंचाचा सुपर एमोलेड फुल HD+ डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन ग्लेशियर ब्ल्यू आणि मिडनाइट ओशिअन कलरमध्ये उपलब्ध असेल.