म्हणून खिशात नोटा भरून फिरतात ट्रम्प


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी वादग्रस्त विधानांनी तर कधी त्यांच्या विचित्र वर्तणुकीने नेहमीच माध्यमात चर्चेत असतात. यावेळी त्यांच्या खिशातून डोकावत असलेल्या २० डॉलरच्या नोटेमुळे ते चर्चेत आहेत. राष्ट्राध्यक्षांसाठी तैनात असलेल्या एअरफोर्स वन विमानांतून कॅलिफोर्नियातील माउंटन व्ह्यू मार्केट फिल्डवर जाण्यासाठी ट्रम्प चालले होते तेव्हा त्यांच्या खिशातून २० डॉलर्सची नोट बाहेर डोकावत होती.

जगातील महासत्तेचा प्रमुख खिशातून रोख रक्कम नेतोय हे पाहून सोबतच्या पत्रकारांनी ट्रम्प यांना त्याबद्दल विचारले. तेव्हा ट्रम्प यांनी खिशातून नोटांची गड्डी बाहेर काढून दाखविली आणि त्याविषयी स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, मी नेहमीच बरोबर कॅश बाळगतो कारण होटेल मध्ये किंवा अन्य ठिकाणी टीप देणे मला आवडते.

ट्रम्प पुढे म्हणाले, माझ्यावर क्रेडीट कार्ड वापरण्याची वेळ दीर्घ काळ आलेली नाही त्यामुळे मी वॉलेट वापरत नाही. तसेच माझ्यावर रोख रक्कम वापरायची वेळ कमी वेळा येते पण होटेल मध्ये टीप देणे मला आवडते आणि त्यामुळे मी कॅश बरोबर बाळगतो. राष्ट्राध्यक्षाला हे वागणे शोभत नाही असे कदाचित तुम्हाला वाटेल पण मला टीप द्यायला आवडतेच आणि त्यासाठी बरोबर पैसे हवेतच.

Leave a Comment