‘या’ क्रिकेटपटूच्या मुलाशी लग्न करू शकते सानिया मिर्झाची बहीण


भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाची बहिण अनम मिर्झाच्या लग्नाच्या बातम्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून भारताच्या महान माजी क्रिकेटपटूच्या मुलाशी तिचे लग्न होऊ शकते.

अनम मिर्झाचे लग्न माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनचा मुलगा मोहम्मद असादुद्दीन याच्याशी होऊ शकते. अनमने असादुद्दीनसोबत अनेक वेळा फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर ते दोघे एकमेकांसोबत डेट करत असल्याने चर्चेत आले होते.

अनमने नुकताच इन्स्टाग्रामवर ‘ब्राइड टू बी’ असा संदेश असलेला एक फोटो शेअर केल्यामुळे तिच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले आहे. पण या दोघांच्या कुटुंबियांकडून अद्याप त्यांच्या लग्ना

विषयी नक्की माहिती मिळालेली नाही. जेव्हा हाच प्रश्न असादुद्दीनला विचारला गेला तेव्हा त्याने याविशषयी लकरच माहिती मिळेल असे सांगितले आहे. सध्या आपल्या सहकाऱ्यांसोबत अनम पॅरिस येथे सुट्टीचा आनंद घेत आहे. ही सुट्टी अनमची बॅचलर्स पार्टी असावी असे लोकांचे म्हणणे आहे.