धोनीच्या पत्नीकडून झारखंडमधील भाजप सरकारचे भांडाफोड


मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याची पत्नी साक्षी धोनी ही बरीच सक्रिय झाली आहे. त्यातच आता तिने एका ट्विटच्या माध्यमातून झारखंडमधील भाजप सरकारवर टीकेची झोड उठवल्याचे समोर येत आहे. झारखंड विधानसभा निवडणुकांची येत्या काही दिवसात घोषणा होणार आहे, याच पार्श्वभूमीवर आपल्या राज्यातील प्रगतीचे दाखले देणारे अनेक दावे सध्या कार्यरत असणाऱ्या झारखंड सरकारने करायला सुरुवात केली होती. याच अंतर्गत झिरो लोडशेडिंग झारखंडमध्ये असल्याचे देखील सांगण्यात आले होते, पण साक्षी धोनी हिने यावर खास टिपण्णी करत हा दावा पूर्णतः फोल असल्याचे सांगितले.

साक्षीचे असे म्हणणे आहे की, रांचीमध्ये दरदिवसा 4 तास लोडशेडिंग होते. ही वेळ कधी कधी 4 ते 6 तासापर्यंत देखील जाते. आणि मुळात जेव्हा हे लोडशेडिंग करतात तेव्हा सण किंवा पावसामुळे हे वीजकपात करावी असे काही कारणही नसते. असे असताना असा प्रकार करणे हा खूपच संतापजनक आहे. याबाबत मुख्यमंत्री रघूबार दास यांनी अहवाल सादर करुन लवकरात लवकर येथील वीजप्रवाह सुरळीत करावा असे आदेश दिले आहेत. आम्ही रांची शहर लोडशेडिंग मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पण त्याला थोडा विलंब झाला आहे असे अधिका-यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment