आता तुम्हाला गुगल शोधून देणार रोजगार


मुंबई : जाएंट सर्च इंजिन अशी ओळख असलेल्या गुगलने आता भारतीय तरुणांसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गुगलने तरुणांना नोकरी शोधण्यासाठी नवा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. गुरुवारी गुगल फॉर इंडिया 2019 कार्यक्रमात याची घोषणा गुगलने केली आहे. याबाबत माहिती देताना गुगलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तरुणांना गुगल पेच्या माध्यमातून विविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी थेट अर्ज करता येणार आहे.

तरुणांना गुगल पेच्या माध्यमातून नोकऱ्या शोधणे आता सोयीस्कर होणार आहे. त्यांचे शिक्षण आणि अनुभव यानुसार नोकरीचे पर्याय उपलब्ध असतील. सध्या 6.7 कोटी युजर्स भारतात गुगल पेचा वापर करतात. यात अब्जावधी रुपयांचा व्यवहार होतो. नव्या प्लॅटफॉर्मवर याचाही फायदा मिळेल. गुगल पे कडून 24सेव्हन, स्विगी, डुंजो यासारख्या हॉटेल सेवा पुरवणाऱ्या 25 पेक्षा जास्त कंपन्यांना एकत्र आणले आहे. त्यांना भविष्यात जॉबसाठीच्या ऑफर या प्लॅटफॉर्मवर देता येणार आहेत.

युजर्सना गुगल पे अॅपवरून त्यांचा अनुभव, गरज याची माहिती देता येते. त्यांचे स्पॉट कार्डही तयार होते. त्याच्या मदतीने गुगल पे अॅप सुरू करताच युजर्सने दिलेली माहिती दिसेल. मेक माय ट्रिपनेदेखील यावर स्पॉट तयार केला आहे. आता येथूनही बूकिंग करता येईल. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याच्या उद्घाटनावेळी सांगितले की, भारत सरकार एक खर्व डिजिटल अर्थव्यवस्था तयार करण्याचे लक्ष्य आहे. यामध्ये देय, सेवा, इंटरनेट ऑफ थिंग्स, ई-कॉमर्स, मशिन लर्निंग यांचा समावेश असेल.

Leave a Comment